माझ्या पत्नीला तिच्या मर्जीनं जगू द्या; मी प्रेम केलं शिक्षा मला मिळायला हवी…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना आग्रा जिल्ह्यातील रकाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ईदगाह कुतुलपूर भागात घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका, असे आवाहन त्याने व्हिडिओमधून केले आहे. सोनूच्या मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सोनू कुमार (वय २१) याने आत्महत्येपूर्वी दोन मिनिटांचा व्हिडीओ केला. त्यात तो हमसून हमसून रडत स्वत:च्या कुटुंबाची माफी मागताना दिसत आहे. आपली पत्नी निर्दोष असून, तिला कोणीही त्रास देऊ नका, अशी विनवणी त्याने जीव देण्यापूर्वी केली आहे. सोनू याने मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादातून सोनूनं आयुष्य संपवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘मी आता दारु प्यायलो आहे. आता मला आता हे सगळं सहन होत नाही. कोणीही माझ्या बायकोला त्रास देऊ नका. ती आपल्या घरी राहील किंवा माहेरी जाईल. पण तिच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. मी गेल्यावर माझ्या पत्नीला तिच्या मर्जीनं जगू द्या,’ अशी अखेरची इच्छा सोनूनं बोलून दाखवली. सोनूचा व्हिडीओ पाहून कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

माझ्या मृत्यूला माझी बायको जबाबदार नसल्याचं सोनूनं व्हिडीओमध्ये अनेकदा म्हटलं आहे. ‘चूक माझी होती. मी लग्न केलं. मी प्रेम केलं. याची शिक्षा मला मिळायला हवी, तिला नको. तिच्या कुटुंबियांनादेखील काही बोलू नका,’ असेही सोनूने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!