पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…

पुणे: एका युवतीवर चार जणांनी वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आरोपीने पीडित युवतीला (वय २०) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर मुख्य आरोपीने आपल्या आणखी तीन मित्रांनाही पीडित युवतीवर अत्याचार करण्यास पाठवल्याची धक्कादायक माहिती वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे.

वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. फरहान रिझवान शेख (वय २०), फजल शेख (वय २०), रेहान रिझवान शेख (वय १८) आणि साहिल (वय २०, चौघेही रा. विमाननगर) असे अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पीडित युवतीला ब्लॅकमेल करत विविध लॉज आणि फ्लॅटवर घेऊन जात अत्याचार केल्याचा आरोप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवतीची ओळख फरहान रिझवान शेख याच्याशी झाली होती. ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाले. फरहानने त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत त्याने युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करण्यासाठी पाठवले. या दरम्यान आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू ठेवला. अखेर या अत्याचाराला कंटाळून युवतीने वाघोली पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पीडितेच्या तक्रारीवरून वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध बलात्कार, धमकी देणे आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास वाघोली पोलिस करत आहेत.

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…

सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!