राखी बांधण्यासाठी मला भाऊ हवा; वडिलांच्या डोळ्यात अश्रू अन् पोलिस…

नवी दिल्ली: मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली होती. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकल्याची चोरी केली. पोलिसांनी शोध घेत गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीमधील टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमध्ये राहणारे संजय गुप्ता (वय 41) आणि अनिता गुप्ता (वय 36) यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र, एक दिवशी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर जवळपास एक वर्षानंतर, मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली, जी पूर्ण करण्यासाठी वडिलांनी टोकाचं पाऊल उचलले. राखी बांधण्यासाठी मला भाऊ हवा आहे, असे मुलीने म्हटल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. पण, आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकून त्यांनी दुचाकी घेतली आणि मध्यरात्री रस्त्यावर फिरू लागले. वडिलांनी फुटपाथवरून एक महिन्याचे बाळ चोरलं. मुलाला घरी आणल्यानंतर त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

चट्टा रेल चौक परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या एका अपंग महिलेचे मूल तिच्यासोबत झोपले होते. मूल चोरीला गेल्यानंतर महिलेने डोळे उघडले असता मूल तिथे नसल्याचे दिसले. गुरुवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. महिलेने याची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने सर्वत्र शोध सुरू केला. पोलिसांनी 400 सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना असे आढळून आले की दोन जण दुचाकीवरून परिसरात फिरत होते, ज्यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिस थेट आरोपीच्या घरी गेले, जिथे मुलगा आरामात झोपला होता. पोलिसांनी आरोपी संजय यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!