पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत

धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन जिल्ह्यात वृक्ष चळवळ राबवत आहेत. वृक्षलागवड आणि संवर्धन करून जनजागृती करत एक हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल त्यांचा शनिवारी (ता. २६) पद्मश्री कल्याण सिंह रावत (देहरादून) प्रमुख मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ), उत्तराखंड यांच्या हस्ते ‘वृक्ष निधी सन्मान पत्र’ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पेतून राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्षारोपण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम हे राबविण्यात येत आहेत. पर्यावरण प्रेमी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील पोलिस अधिकारी, अंमलदार आणि वृक्षप्रेमींच्या सहभागातून वृक्षारोपण चळवळ गतिमान केली आहे. तसेच पोलिस मुख्यालयाच्या परिसरात देखील नागरिकांसाठी मियावाकी उद्यानाची निर्मिती करुन जनतेचा सहभाग या चळवळीमध्ये वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत. या कामात जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार, स्वंयसेवी संस्था, संघटना तसेच वृक्षप्रेमींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी कळंब तालुका हरित करण्यासाठी, पोलिस प्रशासन व सकल कळंबकर यांच्या वतीने अकरा वाजून अकरा मिनिटांनी ११,१११ झाडांची एकाच वेळी लागवड केली होती. या उपक्रमात तालुक्यातील ११००० शालेय विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. कळंब तालुक्यात अकरा हजार एकशे अकरा झाडांची लागवड एकाच वेळी, एकाच दिवशी करण्याचं ठरवण्यात आले होते. यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून, पोलिस प्रशासन व कळंबकर परिश्रम घेत होते. या सगळ्यांच्या परीश्रमामुळे एकाच दिवशी, एकाच वेळी ११,१११ झाडांच्या वृक्षलागवडीचा एक अनोखा उपक्रम कळंबवासीयांनी राबविला होता. या उपक्रमामध्ये कळंब शहरातील, सर्व शाळा, कॉलेज, विविध संघटना, महिला वर्ग, कर्मचारी, व्यापारी यांनी सहभाग घेतला होता. यां सारखे उपक्रम अतुल कुलकर्णी हे रुजू झाल्यापासूनच राबवित आहेत. याचीच दखल घेऊन भवानी योग क्षेत्रम् गंधोरा येथे आयोजीत कार्यक्रमात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन जिल्ह्यात वृक्ष चळवळ राबवून वृक्षलागवड आणि संवर्धन करून जनजागृती करत एक हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल त्यांचा (शनिवार, दि.२६ ऑगस्ट रोजी) पद्मश्री कल्याण सिंह रावत (देहरादून) प्रमुख मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ), उत्तराखंड यांच्या हस्ते ‘वृक्ष निधी सन्मान पत्र’ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

पद्मश्री कल्याण सिंह रावत म्हणाले की, ‘मी आज स्वतःला भाग्यशाली समजतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राज्यात मला योगी अरविंदजी यांच्या मुळे बोलण्याची संधी मिळाली. समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे, वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे, असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍यक आहे. तेच काम अतुल कुलकर्णी आता करत आहेत. पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊन त्याचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. पर्यावरणतज्ज्ञ मंडळी यासाठी खूप प्रयत्न करत असतात, प्रचार करत असतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने शरीर निरोगी ठेवायचे असेल, तन-मन संतुलित ठेवायचे असेल तर हे सगळे वनस्पतींशिवाय शक्‍य होणार नाही हे लक्षात घेऊन पर्यावरणाची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे.’

अतुल कुलकर्णी एक मोठे अधिकारी असून सुध्दा वेळात वेळ काढून त्यांनी आता पर्यंत जे काही केले ते खरंच कौतुकास्पद आहे. ‘वृक्ष निधी सन्मान पत्राचा खऱ्या अर्थाने आज सन्मान झाला आहे. या नंतर बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, ‘आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. शिवाय, वृक्षलागवड देखील महत्वाचे आहे.’ पद्मश्री कल्याण सिंह रावत यांचे आभार मानून योगी अरविंदजी महाराज यांनी एक कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम चालू केले आहे त्याचे सुद्धा कौतुक केले. वृक्ष चळवळीमध्ये आम्ही सहभाग घेतला होता तसाच यापुढे जिल्ह्यात वृक्षारोपण आणि सेंद्रिेय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलिस दल आणि भवानी योग क्षेत्रम् गंधोरा सोबतीने काम करणार असल्याची माहिती अध्यक्ष योगी अरविंदजी महाराज यांनी या वेळी बोलताना दिली. वाटप केलेल्या झाडांमध्ये आंबा, पेरू, सीताफळ, लिंबू आदी झाडांचा समावेश होता. आता पर्यंत ४२४० झाडांपैकी ३५९० झाडांचे वाटप झाले असून उर्वरित झाडांचे वाटप हे चालू आहे.’

या कार्यक्रमावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि- स्वप्निल लोखंडे, पोउपनि- रियाज पटेल, तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोनि- गजानन घाडगे, डॉ.अनिकेत इनामदार, गणेश चादरे, दयानंद वाघमारे, ग्रामसेवक- स्वाती खोपडे, सरपंच- बबिता राठोड, उपसरपंच- संजय भोसले, तंटामुक्त अध्यक्ष- संतोष मुसळे, पोलिस पाटील- गजेंद्र कोनाळे, माजी सरपंच- प्रभाकर भोसले, कृषी सहायक- अजित बरडे, इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक- विजय नवले, श्रीनिवास भोसले, नंदिनी आलुरे, योगिता बारुळकर, केरनाथ कांबळे, प्रशांत पाटील, कमलाकर पाटील, बाबुराव भोसले, मनोज भोसले, प्रवीण (बाळु) पाटील, प्रवीण पाटील, महेश साखरे, ज्ञानेश्वर साखरे, उमेश साखरे, मधुकर भोसले, भुजंग भोसले, मधुकर राठोड, सुधाकर राठोड, अशोक भोसले, उल्हास जाधव, कृष्णाथ साखरे, ज्ञानदेव भोसले, भैरवनाथ तुळजापूरे, लक्ष्मण शिंदे, सचिन शिंदे, नबिलाल शेख, धनाजी धोतरकर, धनंजय गिरे, महादेव भोसले, पत्रकार – लतिफ (मामा) शेख, आयुब शेख, प्रतिक भोसले यांच्या सह इंदिरा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!