
पुणे पोलिसांनी नवले पूल परिसरातील लॉजवर छापा टाकला अन्…
पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत नऊ मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करून त्या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहव्यापारासाठी आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी राकेश राजू पाटोळे (वय २७, रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी) व मंगेश व्यंकट बनसोडे यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीविरुद्धही आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतरलॉजवर छापा टाकण्यात आला. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…
पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

