रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…
भंडारा: दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला वाहन लावून नातेवाईकांसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालचंद ठोंबरे (वय 55), वनिता ठोंबरे (वय 50, रा. वरठी) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी परिसरात हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या एका नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी लावली आणि ते नातेवाईकाशी बोलत होते. एवढ्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात नलु दामोधर बडवाईक (वय 40 रा. खरबी) या जखमी झाल्या आहेत. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बालचंद ठोंबरे हे तुमसर रेल्वे येथे कार्यरत आहेत. ठोंबरे कुटुंबीय हे शिर्डी, शेगाव, महाबळेश्वर येथे देवदर्शनाहून रविवारी सकाळी गावी परतले होते. त्यानंतर मुलाच्या सासरी नातेवाईकांना सोडण्यासाठी ते खरबी येथे आले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असताना भंडाराकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच 40 / सीडी 4737) दुचाकीला (एमएच 36 / एल 6534) जोरदार धडक दिली. यात हे पती-पत्नी जागीच ठार झाले. गंभीर जखमी महिलेच्या मानेचे हाड तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…
हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…