संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

मुंबई : मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामधून संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओची माहिती समोर आली आहे. मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांच्यासोबत आरोपीने फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंमधून आरोपींनी त्यावेळी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे पाहायला मिळते. सीआयडीला हे सर्व पुरावे आरोपी महेश केदार याच्या फोनमधून जप्त केले आहेत. संबंधित फोटो प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

सीआयडीने आरोपींचे काही मोबाईल हस्तगत केले होते. सीआयडीने पाच मोबाईल हस्तगत केले होते. त्यातला एक फोन केदार नावाच्या आरोपीचा होता. महेश केदार याच्या मोबाईलचे स्क्रीन लॉक उघडले तेव्हा सीआयडीला 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढल्याचे समोर आले आहे. सध्या समोर आलेले फोटो हे व्हिडिओतून घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती आहेत. सीआयडीला या तपासात केवळ फोटो आणि व्हिडिओसह ऑडिओ क्लीप देखील मिळाल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख यांना अतिषय क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या तोंडावर लघवी करण्यात आली आहे. अतिषय क्रूरपणे त्यांचा खून केल्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. फोटो पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर ही संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडलं ते माणुसकीला लाजवणारी घटना आहे, असे म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ, पत्नी, मुलगी, आई हे सगळं पहिल्या दिवसापासून बघत आहेत. देशमुख कुटुंबाच्या दु:खात कोणीतरी लक्ष घालावे. वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची हिम्मत कशी होते? कुठली तरी राजकीय ताकद असल्याशिवाय हे होणार नाही. बीडमध्ये संतोष देशमुख, महादेव मुंडे यांची हत्या असेल, या सगळ्या हत्या होत असताना सरकारची यंत्रणा कुणाला लपवत होती. ती यंत्रणा बीड जिल्ह्यात कोण चालवत होते याचं उत्तर राज्य सरकारने द्यायला हवे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

वाल्मिक कराडवर अनेक एफआयआर होते. दोन प्रकरणातून त्याची नावं वगळण्यात आली. आरोपींचे सीडीआर का मिळत नाही. कृष्णा आंधळे गायब आहे, त्याचा सीडीआर का काढला जात नाही. सातवा खुनी 75 दिवस का सापडत नाहीत. तो का फरार आहे? यांच्या मागं कुणाची यंत्रणा होती, हा कुणाचा माणूस होता, कोण त्यांना ताकद देत होते, याचं उत्तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!