धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं…

बीडः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कैलास फड याला परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय कैलास फड कडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कैलास फड याने शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार केला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत ! आणि एक पिस्तुल धारी माणूस. दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड व मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवतात ? वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? ही तक्रार सुद्धा एसपी नवनीत कावत यांना दिली. कारवाईची अपेक्षा” दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्वीट केल्यानंतर पोलिसांकडून फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही. इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असे आवाहनही दमानिया यांनी फडणवीस यांना केले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!