पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…

पुणे : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने महिला सेक्रेटरीचे हात-पाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात माहिती लपवल्याने वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे. वकील आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय १३) ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पूनम दिनेश मून (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ॲड. संजय सावंत, पत्नी स्वाती सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पूनम साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून नोकरी करीत होत्या. पूनम गुरुवारी (ता. १६) त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत; त्यामुळे दिनेशने ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले. त्या वेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. अखेर, रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दिनेश शुक्रवारी सकाळी वकिलाच्या कार्यालयाकडे आले. शटरला कुलूप नसल्याने दिनेश यांनी शटर उघडून आत गेले असता पूनम रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांनतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे राजेंद्र मुळीक यांनी घटनास्थळी भेट दिली. ॲड. सावंत आणि पत्नी स्वाती यांना रात्री अटक करण्यात आली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे, असे चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश बडाख सांगितले.

वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने पूनमचा खून करून मृतदेह कार्यालयातच ठेवला होता. ही घटना लपवल्यामुळे वकिलालाही सहआरोपी केले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…

पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…

पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!