
पुणे शहरातील आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारा आरोपी फहीम फिरोज खान (वय 20 रा गल्ली नंबर 19 आंबेडकर नगर, मार्केटयार्ड ता. हवेली जि. पुणे) यास पोलिस आयुक्त यांचे कार्यालय जा क्र /पीसीबी/ स्थानबद्ध/ मार्केटयार्ड/ खान/145/2025, दिनांक 25/02/2025 अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले,औषधी द्रव्य विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती वगैरे यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1981 चे कलम 3(2) प्रमाणे 01 वर्षा करीता वर्धा कारागृह वर्धा येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश झाल्याने आरोपीस यास दि. 01/03/2025 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी केली आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा सह पोलिस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, राजकुमार शिंदे पोलिस उप-आयुक्त परि-05 पुणे शहर, धन्यकुमार गोडसे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, व.पो.नि. मनिषा पाटील यांचे मार्गदर्शना प्रमाणे सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी कट्टे, सहा पोलिस निरीक्षक, चेतन मोरे व पोलिस उप निरीक्षक सुनील भापकर (तपास पथक) पोलिस अंमलदार अमरनाथ लोणकर, पोलिस अंमलदार समीर चव्हाण (सर्वॆलन्स पथक), पो हवा राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, पो शि.आशिष यादव, पो . शि.संदीप सुर्यवंशी सर्व नेमणूक, (तपासपथक) मार्केटयार्ड पोलिस स्टेशन, पुणे शहर, यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये रंगला चकमकीचा थरार; गोळीबारात दरोडेखोर जखमी…
स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; १० गुन्हे उघडकीस…
राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

