
नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल आज (सोमवार) समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला मरेपर्यंत फाशीची ठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.
शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी म्हटले आहे की, ‘आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाच पर्याय सोडला नाही. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. पीडित मुलगी अवघी ३ वर्षांची होती. लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. कृत्य आरोपीनेच केल्याचे सिद्ध झाले आहे. हत्येनंतरही आरोपीनं अत्याचार सुरूच ठेवला. या प्रकरणात १६ दिवसांचं आरोपपत्र दाखल झाले. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे. ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे.’
View this post on Instagram
न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली.
दरम्यान, १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…
पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…
पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…
नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…

