पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारां मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे.

फिर्यादी यांच्या मुलास १७/०९/२०२३ रोजी मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे व तीन विधीसंघर्षीत बालके यांनी संगनमत करुन, पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारांनी फिर्यादी यांच्या मुलांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यास जीवे ठार केले व धारदार हत्यारे हवेत फिरवून आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर असाच एका-एकाचा मुडदा पाडू असे जोर-जोरात बोलुन सदर परीसरात दहशत पसरवली. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस स्टेशन गु.र. नं. १४०६/२०२३, भादविक ३०२, १२० (ब), १४३, १४४,१४७, १४८,१४९, ३४, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाचा हडपसर पो स्टे व गुन्हे शाखा युनिट ०५ हे समांतर तपास करीत असताना, त्यांना त्यांचे बातमीरादारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन व सापळा लावून दाखल गुन्हयातील निष्पन्न झालेले आरोपी
१ ) बाबु नामदेव मिरेकर, वय ५४ वर्ष, वैदुवाडी, हडपसर, पुणे ( टोळी प्रमुख),
२) आकाश हनुमंत कांबळे, वय २० वर्ष, रा. सदर
३ ) अमन नवीन शेख, वय २३ वर्ष, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे
४) सरताज नबीलाल शेख, वय २० वर्ष,रा. वैदवाडी, हडपसर, पुणे
५) सनी रावसाहेब कांबळे, वय २३ वर्ष, रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी पुणे
६) रोहित शंकर हनुवते, वय २२ वर्षे, रा. नवीन म्हाडा बिल्डींग, हडपसर, पुणे ( टोळी सदस्य) यांना अटक केलेली असून, तीन विधीसंघर्षीत बालके ताब्यात घेतली आहेत.

सदर आरोपीचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता नमुद गुन्ह्यातील आरोपी बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) याने स्वतःचे नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली असून त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेवून टोळीतील सदस्यांनी एकट्याने किंवा संघटीतरित्या लोकांना घातक शस्त्राने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगुन जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, खंडणी स्वरुपात पैसे उकळणे, छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांचेकडुन फुकट वस्तू घेणे, अशा प्रकारचे गुन्हे त्याचे विरुध्द पुणे शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यांनी हडपसर परिसरात दहशत निर्माण केली आहे.

दाखल गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(i),३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलिस उप-आयुक्त, परि-०५, पुणे, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १४०६/२०२३ भादविक ३०२,१२० (ब) १४३,१४४,१४७,१४८,१४९,३४, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह१३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंट कायदा कलम ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(i), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे अश्विनी राख या करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त,परी-०५,पुणे, विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, अश्विनी राख त्यांचे मार्गर्शनाखाली हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद शेळके, पोलिस निरीक्षक,(गुन्हे), विश्वास डगळे, संदिप शिवले, सहा. पोलिस निरीक्षक, सारीका जगताप, सहा. पोलिस निरीक्षक, प्रमोद दोरकर हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील पोलिस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामश्वेर नवले यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!