
नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…
नाशिकः नाशिक-मुंबई महामार्गावर उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ हत्या करण्यात आली आहे. गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामगेवर गोळ्या झाडल्या आहेत. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला. भूषण लहामागे याची हत्या करून आरोपी पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे. गोळीबारासोबतच भूषण लहामागेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.
नाशिक-मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगल्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शिवाय, मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…
नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…
नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला अपहृत मुलीचा शोध…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

