
जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…
जळगाव: विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्या घरात जात तिला संपवत स्वत: टोकाचं पाऊल उचलले आहे. प्रियकराने स्वत:ला संपवण्याआधी शेवटचा मेसेज टाइप केला. मात्र, तो सेंड झाला नसल्याचे समोर आले आहे.
अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. दोघांचाही मृत्यू झाला आहे. अकुलखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी देवानंद धनगर याने अनिताच्या पतीला पाठवण्यासाठी “जगदीश, मला माफ करा. माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही…” हा मेसेज टाईप करून ठेवला होता. पण तो मेसेज सेंड व्हायच्या आतच रक्ताचा सडा पडला आणि दोन आयुष्यांचा करुण अंत झाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंदच्या मोबाईलमध्ये एक अनसेंड (Unsent) मेसेज सापडला आहे. त्यात त्याने लिहिले होते की, “मला ती (अनिता) टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते. मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही”. मात्र तो क्लिक करण्यापूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
अनिता जगदीश पाटील आणि देवानंद सुभाष धनगर (वय २६) यांचे गेल्या ४-५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावरून झालेली ही ओळख प्रेमात बदलली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे देवानंद संतापला होता. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने मोटारसायकलने अकुलखेडा गाठले. तिथे दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले.
देवानंदने आपल्यासोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून आधी अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर काही क्षणातच स्वतःवरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. हॉटेल संकेतच्या मागे असलेल्या प्लॉट भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घटना घडली तेव्हा अनिताचे पती जगदीश पाटील हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; सोशल मीडियावरून प्रेम…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

