Video Call वर महिलेशी मैत्री; रोमॅन्टिक गोष्टी अन् पुढे…
शिमला (हिमाचल प्रदेश): एका महिलेने गोड बोलून एका व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याची 27 लाखांची फसवणूक केल्याची घटना मंडी जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
महिलेने व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तीशी मैत्री केली. व्हिडिओ कॉलवरून रोमॅन्टिक गोष्टी करू लागले. पण, या महिलेने स्क्रीन रेकॉर्ड करून त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तोच व्हिडिओ परत पाठवून धमकावण्यास सुरुवात केली. आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी या पुरुषाने आतापर्यंत 27.14 लाख रुपये संबंधित महिलेला दिले आहेत. शेवटी त्याने सायबर क्राईम पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी तक्रारदारासह व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेची खोटी कहाणी रचली. ते स्वतः पोलीस अधिकारी आणि सीबीआय अधिकारी बनले आणि या केसमधून तक्रारदाराचे नाव हटवण्याच्या नावाखाली पैसे देण्याकरिता दबाव आणू लागले. अशा प्रकारे तक्रारदाराने आत्तापर्यंत विविध माध्यमातून 91 ट्रॅन्झॅक्शनद्वारे एकूण 27,14,500 रुपये फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यापैकी काही पैसे त्याने नातेवाईकांकडून उसने घेतले आहेत. शिवाय त्याला बँकेकडून कर्जही घ्यावे लागले आहे.
सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 318 (4) आणि 319 (2) व आयटी कायद्यातील कलम 66 (डी) नुसार गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित ट्रॅन्झॅक्शनचा तपास सुरू केला आहे.
पोलिसकाका Video News: 01 ऑगस्ट रोजीच्या Top 10 बातम्या…
सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…