खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
मुंबई: पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात. परंतु, खासगी वाहनातून फिरताना ‘पोलिस’ असल्याचे स्टीकर, प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे.
पोलिस कुटुंबासमवेत किंवा स्वत: खासगी कामानिमित्त वाहनातून जात असताना आपल्याला कोणी अडवू नये. किंवा आपला जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांत गेल्यानंतर तसेच अन्य राज्यांत गेल्यानंतरही आपण पोलिस असल्यामुळे अडवले जाऊ नये, असे वाटते. त्यामुळे अनेकजण खासगी गाडीवर पोलिस असल्याचे स्टीकर लावतात. काही जण पुढच्या भागात काचेजवळ पोलिस असल्याचा छोटा फलक दिसेल, असा ठेवतात. काही जण गाडीवर थेट बोधचिन्हही वापरतात. परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार, असे लिहिता येत नाही. याबाबत पूर्वीही परिवहन विभागाने निर्देश दिले आहेत.
विकी जाधव नावाच्या तक्रारदाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी खासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिता येत नाही. त्याचबरोबर खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असेही लिहिता येत नाही. त्यामुळे ‘पोलिस’ आणि ‘शासन’ असे लिहिणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…