पुणे! नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची कडक नियमावली, उल्लंघन केल्यास थेट…

पुणे : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, उल्लंघन केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह असतो. 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हॉटेल्स, पब, लॉज, फार्महाऊस तसेच खासगी ठिकाणी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले जाते. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येते. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, किरकोळ वादातून हाणामारी होणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडतात. या घटनांनाच आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक संवेदनशील असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकांचा काळ सुरू असल्याने पोलिस यंत्रणा आणि प्रशासन आधीच सतर्क आहे. त्यातच 31 डिसेंबरच्या जल्लोषामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान अधिक वाढले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी किंवा नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. पुणे शहरातील विविध नाकाबंदी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना कोणी आढळल्यास वाहन जप्ती, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंदवला जाणार आहे.

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!