पोलिसांना धमकी देणाऱ्या श्रीमंताच्या पोराची काही वेळातच उतरवली मुजोरी…

छत्रपती संभाजीनगर : ‘तुने पहेचाना नही क्या, मैं कोण हूँ, दो घंटे में तेरी वर्दी उतारता हूँ,’ असे म्हणत वाहतूक पोलिसांना एकाने धमकी दिली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चालकाचा समाचार घेतला होता. पोलिसांनी संबंधित चालकाला मोटारीसह ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कुणाल बाकलीवाल असे धनाडग्याचे नाव आहे. कुणाल हा आपल्या काळ्या रंगाच्या डिफेन्डर एसयुव्हीमधून सायरन वाजवत चालला होता. पोलिसांनी त्याला अडवलं आणि गाडी बाजूला घेण्यास सांगितली. आपली गाडी अडवली म्हणून तो पोलिसांच्या अंगावरच धावून गेला. शिवाय, पोलिसांना शिव्या देण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी या कुणाल बाकलीवालची कार बाजूला घेतल्यावर शांतपणे विचारपूस केली. वाहतूक पोलिसांसोबतच ‘हुज्जत घालून तेरे को ट्राफिक ड्यूटी करने नहीं आती. तुनें पहेचाना नहीं क्या मैं कौण हुँ आणि बुड्ढे तेरे को ड्युटी करने आती क्या,’ असे म्हणत शिवीगाळ केली. पोलिस असाल तर माझे बाप झालात की देव झालात असेही तो म्हणाला. वाहतूक पोलिसांनी या श्रीमंत बापाच्या पोऱ्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. पण उलट तो वरिष्ठ पोलिसांना फोन लावून दमदाटी करत असल्याचे समोर आले. त्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे फोटो काढले आणि ‘अब तुमको मैं सस्पेंड करता हुँ और दो घंटे में तेरी वर्दी उतारता हूँ’ अशी धमकी दिली. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवत या श्रीमंत बापाच्या पोराला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. त्याच्याविरोधात क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल बाकलीवाल या धनाड्या मुजोर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कार सुद्धा ताब्यात घेतली आहे. कुणाल बाकालीवालवर आणखी एक गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धमक्या देणे प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…

भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!