
बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
बीड : बीड जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दहा जणांना जीव गमवावा लागला आहे. बीड-अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दौलावडगावजवळ रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला आहे.
कडा-धामणगावकडून अहमदनगरकडे जाताना वळण घेणाऱ्या ट्रकला नगरच्या दिशेने रूग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगावदवळ बुधवारी रात्री साडेअकराच्या घडला आहे.
पहिला अपघात :
पहिल्या अपघातात आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव परिसरात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र. MH 21 X 8600) हा धामणगावहून अहमदनगरच्या दिशेने जात होता. दरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना या ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेची (क्र. MH 16 Q 9507) धडक बसली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे यांच्यासह रुग्णवाहिकेतील मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरा अपघात :
मुंबईहून बीडकडे जात असलेली सागर ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने उलटल्याची घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी फाटानजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय,अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना आष्टी जामखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…
शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात…
दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!