महिलेसह दोन चिमुकल्यांचे आढळले मृतदेह; नवरा बेशुद्ध करायचा…

नवी दिल्ली : नैर्ऋत्य दिल्लीतल्या मुनिरका भागात असलेल्या एका घरातून एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. वर्षा शर्मा (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तपासादरम्यान महिलेच्या वडिलांनी पोलिसांकडे चार पानी पत्र सुपूर्द केल्याने खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा शर्मा आणि तिच्या अडीच आणि चार वर्षांच्या दोन मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. वर्षाचा नवरा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये कॉन्स्टेबल आहे. 8 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजता दिल्ली पोलिसांना मुनिरका भागातून कॉल आला. एका महिलेने घरात आत्महत्या केली असून, दरवाजा बाहेरून लॉक असल्याचं सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घराचा दरवाजा तोडला असता, घरातल्या खोलीत तीन मृतदेह दिसले. त्यांच्या मनगटावर जखमेच्या खुणा होत्या. या महिलेने आपल्या दोन्ही मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पण घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्टच आहे. पोलिस तिन्ही मृतदेहांच्या पोस्टमॉर्टेम अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

मृत महिलेच्या वडिलांनी चार पानी तक्रारपत्र किशनगड पोलिस ठाण्याकडे दाखल केली आहे. तक्रारीत फिर्यादीने जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षा यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तक्रारदाराने जावई जोगेंद्रवर तंत्र-मंत्र, पूजा-पाठ, नशा करणे, मारहाण करणे आणि हुंड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला त्रास देणे असे आरोप केले आहेत. शिवाय, ‘माझा नवरा मला नशायुक्त औषधं देतो,’ असे वर्षाने फोनवर सांगितले होते. ती बेशुद्ध पडल्यावर तो तंत्र-मंत्राचे प्रयोग करत असे. हा प्रकार अनेकदा झाला होता. मृत महिलेच्या वडिलांनी जावयास याबाबत विचारलं असता, वर्षाला भूतबाधा असल्याने हवन आणि पूजा करत असल्याचे त्याने सांगितले. ही आत्महत्या नसून कट रचून केलेली हत्या आहे, असा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!