‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर आज (गुरुवार) तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत.

बदलापूर अत्याचार प्रकरणात नागरिक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी आपले ब्रिदवाक्य लक्षात घ्यावे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ याचा अर्थ समजून घ्या, अशी समज देखील न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, असे खडेबोलही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहेत.

बदलापूर प्रकरणी सुनावणीतील महत्वाचे मुद्दे:
– पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का?
– बदलापूर पोलीसांनी केलं काय?
– इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही…
– कारवाचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही…
– बदलापूर पोलीसांनी यात काय केलं?, याचा अहवाल सादर करा
– बदलापूर पोलीसांनी काय कारवाई केली हे आम्हाला पाहाचंय
– त्यांनी त्यांचं काम केलेलं नाही, हे सध्यातरी दिसतंय
– शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीरतेनं घ्या – हायकोर्ट
– पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब, राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश
– महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रिदवाक्य लक्षात घ्यावे
– ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ याचा अर्थ समजून घ्या
– महाराष्ट्रातून गायब होणा-या महिलांच्या मुद्यावर राज्य सरकारला नोटीस जारी
– गेल्या 5 वर्षात राज्यभरातून 1 लाखांहून अधिक महिला गायब
– शहाजी जगताप या माजी सैनिकाची हायकोर्टात याचिका
– राज्य महिला आयोगाला यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, योग्य त्या उपाययोजना सुचवण्याचे निर्देश जारी
– मंगळवारी (27 ऑगस्ट) रोजी सुनावणीआधी अहवाल सादर करा, न्यायालयाचे निर्देश

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!