
वैष्णवी हगवणे प्रकरण! बनावट बॅंकेचे एजंट बनून जेसीबी घेणारे ताब्यात…
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणांतर हगवणेच्या कुटुंबियांचा एक एक कारनामा समोर येत आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचे आता पोलिस तपासात समोर आले आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला होता. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील जेसीबी गोडाऊनमध्ये आला नाही असे सांगत हगवणे यांची पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराडांनी पोलिस चौकशीत दिली आहे. त्यामुळे येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे बनावट बँकेचे अधिकारी हे हगवणेची माणसं होती आणि हा कटाचा भाग होता, हे समोर आले आहे. जेसीबी जप्त करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्याचे तपासात इंडस इंड बँकचे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकवरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचे सांगितले आहे. पण, तीन जणांनी जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले व ते आरोपी शशांक हगवणे याचे ताब्यात दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे…
1. योगेश राजेंद्र रासकर, व. 25, रा. तळेगाव ढमढेरे
2. गणेश रमेश पोतले, व. 30, रा. मोहितेवाडी
3. वैभव मोहन पिंगळे, व. 27, रा. तळेगाव ढमढेरे
दरम्यान, जेसीबी हगवणे यांनी काळवंडे यांना विकला. मात्र जेसीबीचे हप्ते थकले म्हणून इंडस इंड बँकेने हा जेसीबी प्रकाश येळवंडे यांच्याकडून जप्त केला असे शशांक हगवणे याने भासवल्याचा समोर आले आहे. या प्रकरणात इंडस इंड बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून कोणताही जेसीबी जप्त केला नाही. आम्ही कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळेच आता शशांक हगवणे यानेच त्याचे बॅंकेचे एजंट म्हणून पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून हा जेसीपी जप्त केला, अशी माहिती पोलिस तपासामध्ये समोर आली आहे.
बँकेने कोणतीही गाडी जप्त केली तर ती या गोडाऊनमध्ये येते परंतु तो जेसीबी तिथे आला नाही, म्हणजे थेट शशांक हगवणे यानी त्याची माणसं पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करून घेतला आणि बँकेने जप्त केला आहे, असे सांगितलं आणि तो थेट आपल्या ताब्यात घेतला, यामुळे आता शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.
IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…
वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…
वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…
हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…
हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…
मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…
राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

