भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…

नाशिक : विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिकरोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घडली आहे. यावेळी गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वात अतीशय अटीतटीच्या सामन्यात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. संपूर्ण देशभरात मोठा आनंद साजरा केला जात असताना नाशिकरोड येथील विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे आनंद व्यक्त करताना देवळाली गाव आणि विहितगाव येथील गटात तुफान राडा झाला. यात गोळीबार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला.

एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्याने एकाच्या मांडीला गोळी लागली. तर राड्यात झालेल्या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे. जुन्या कुरापतीवरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार आणि हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…

नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!