ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोन पोलिसांची नावे असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत.
ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी आज काढले आहेत. ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून 1 ऑक्टोबर 2023 रोजी पळून गेला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन पोलिस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील केद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डबाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या काही गोष्टी तपासातून समोर आल्या आहेत. ललित पाटील प्रकरणात आणखी चौघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन आरोपी इमरान शेख उर्फ अतिक खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले.
या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली.
या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे 2 कोटी 14 लाख 30 हजार 600 रुपये आहे. आतापर्यंत या पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे, चार चाकी वाहने, महागडे मोबाइल खरेदी केलेले आहेत. ही सर्व रक्कम सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या वर आहे.
ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…
ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!