जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…
जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची आता गृह विभागाने गंभीर दखल घेतली असून, जालना पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे.
जालन्यात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. विरोधकांनीही सरकारवर टीका सुरू केली आहे. यानंतर जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर थेट गृहविभागानंच कारवाई करत, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले होते. यानंतर पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत.
जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…
Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…