ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर गुन्हा दाखल नाही. हे मोठे रॅकेट असून यामध्ये राजकीय मंडळींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळ काढूपणा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

ललित पाटील प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘ललित पाटील कसा पळाला, हे सगळ्यांनीच पाहिले आहे. ससूनचे डीन काही यात बोलत नाही. कुणीच काही कारवाई करत नाही. पोलिस फक्त ललित पाटील याची जमा केलेली संपत्ती फक्त मोजदाद करत आहे. या पलीकडे काहीच काम करत नाही. या प्रकरणामध्ये मोठी राजकीय नेते आहे, आजी माजी पोलिस अधिकारी आहे. मला तर अशी भीती वाटतेय की ललित पाटील याचा एन्काऊंटर होऊ शकतो.’

पुणे पोलिसांनी ललित पाटीलबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना अनेकदा प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिला भेटला. प्रज्ञा कांबळे अनेक वेळा ससून रुग्णालयात येऊन गेली. ललित रुग्णालयात असताना हे दोघे अनेक वेळा हॉटेलात भेटल्याचीही पुणे पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. ललित आणि प्रज्ञा कांबळे पुण्यात अनेकदा भेटले असल्याची पुणे पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. ड्रग्स तस्करीतून मिळालेल्या पैशातून प्रज्ञा कांबळे हिने अनेक मोबाईल फोन आणि गाड्या खरेदी केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुणे विशेष न्यायालयात आज सुनावणी झाली. ललित पाटीलची प्रेयसी प्रज्ञा कांबळे आणि त्याची मैत्रीण अर्चना निकम या दोघींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुणे पोलिसांनी दोघींनाही न्यायालयात हजर केले होते. ड्रॅग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा दोघींवर आरोप आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!