उत्तराखंड बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला Video समोर…

डेहराडूनः उत्तराखंड मधील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा त्यांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे. आता या पाईपद्वारे इंडोस्कोपिक कॅमेरा पाठवून कामगारांची परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे बोगद्याच्या आतील मजुरांची परिस्थिती समोर आली आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. दरम्यान, कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यास आणखी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. बोगद्यातील माती पुन्हा खाली आल्याने बचावकार्य लांबले आहे. दुसऱ्या चार बाजूने उभे आणि तिरप्या मार्गाने बोगदा खणून मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!