आपल्या कर्तव्यामुळे नावारूपाला आलेले पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे…
सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि अक्षय सोनवणे हे संयम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर यश आपोआपच मिळते. फक्त त्यासाठी लढावे लागते…
अल्प परिचय…
अक्षय सोनवणे यांचा पुणे जिल्ह्याच्या मातीत जन्म झाला. पुरंदर तालुक्यातील कोडीत हे सोनवणे यांचे मूळ गाव. परंतु, लहान पणापासून वारजे माळवाडी, पुणे शहर येथे आपले त्यांचे बालपण व शिक्षण पुर्ण झाले. प्राथमिक/माध्यमिक शिक्षण= प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुणे येथील यशोदीप विद्यालय आणि मामासाहेब मोहोळ विद्यालय. सीनियर कॉलेज=मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये पुर्ण केले.
महाराष्ट्र पोलिस दलात दाखल…
प्रत्येक पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठं अधिकारी बनावे, अशी अपेक्षा आई वडिलांना असतेच. मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील देखील मोठे आव्हान पेलतात. यातच मुलं-मुली देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. दरम्यान, जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर यशस्वी होता येते यात काही शंका नाही. यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असे नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे अक्षय सोनवणे यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात वयाच्या 22 व्या वर्षी, सन 2012 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले आहेत. वडील आप्पा सोनवणे व आई बबीता सोनवणे यांचे स्वप्न मुलाने साकार केले आहे.
उल्लेखनीय कामगिरी…
1) सन 2016 साली 3 राज्य म्हणजेच गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली या तीन राज्यांना पाहिजे असलेल्या सराईत आरोपी नरेश उर्फ खाटा लखमा दळवी यास पालघर जिल्ह्यात वेशभूषा करून पकडले. यामध्ये सदर आरोपीवर दरोडा, लूटमार असे 35 पेक्षा जास्त गुन्हे तीन राज्यांमध्ये मिळून दाखल होते. सदर आरोपीला पकडताना खोल दरीमध्ये कोसळून जखमी झाले होते तरी देखील जीव धोक्यात घालून आरोपीस पकडले.
2) सन 2021 आली रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना मुंबई येथून ड्रग्स केस मध्ये फरार असलेला आणि अंडर वर्ल्ड सोबत संबंध असलेला खतरनाक गुन्हेगार आरिफ भुजावाला हा गुन्हा करून माणगाव गोरेगाव येथे लपलेला होता. सदर आरोपीस पकडून नार्कोटिक्स कंट्रोल ऑफ ब्युरो डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले. याबद्दल नार्कोटिक कंट्रोल ऑफ ब्युरो विभागाच्या संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला.
कौतुकास्पद क्षण…
1) पोलिस दलात दाखल झाल्यापासून पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त रिवॉर्ड मिळालेले आहेत.
2) फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना 36 प्रशंसा पत्र मिळाले.
3) दहीवडी येथे महिला पथदर्शी प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक सो सातारा यांनी सलग 9 महिने प्रशंसा पत्र देऊन गौरविले.
कर्तव्यामुळे सोनवणे आले नावारूपाला…
सातारा जिल्ह्यात प्रमोशन वर सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर रुजू झाल्या नंतर फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथे नियुक्ती मिळाली ,तिथे काम करताना मोटरसायकल चोऱ्या ,डीपी चोरी तसेच इतर घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले.व तरूण तडफदार अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
दहीवडी येथे अवैध धंद्यांवर कारवाई…
दहीवडी पोलिस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून आज अखेर अवैध धंदे बंद करून अवैध धंदेवाल्यामध्ये दहशत निर्माण केली आहे.दहिवडी पोलिस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर दोनच दिवसात दहा लाख रुपयांची गांजा रेड करून आरोपीस पकडले.व अल्पशा कालावधीत कायद्याचा दरारा निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेची घडी सुरळीत करणारे डॅशिंग अधिकारी म्हणून सोनवणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.. प्रशासनाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला सोनवणे यांनी अनेक गुंतागुंतीचे गुन्हे कौशल्याने उघडकीस आणले. त्यासोबतच पोलिस ठाण्यात अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान करून देण्यामुळे त्यांची विश्वासार्हता व लोकप्रियता चांगली निर्माण झाली.
– उदय आठल्ये
खाकी वर्दीचे आपलेपण जपणारे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके…
तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…
वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….
जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…