हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…

पन्हाळा (जि. कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील राक्षीमध्ये खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला आहे. जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. ऐन दिवाळीत घटना घडल्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दोघे भाऊ बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक व गावकरी मागील चार दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह सापडले आहेत. डुकरांना चोरून शिकारीसाठी वीजेच्या तारा लावून मृतदेह फेकून देणाऱ्या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतिराम कुंभार आणि नायकू कुंभार हे सख्खे भाऊ बुधवारी (ता. ८) रात्री खेकडं पकडण्यासाठी धरणाचा ओढा भागात गेले होते. परंतु, ते घरी परतले नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलांनी खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या परिसरात शोध सुरू केला. शोध घेण्यासाठी ड्रोनची सुद्धा मदत घेण्यात आली, पण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी दोघे बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी बेपत्ता भावांचा तपास सुरु केल्यानंतर धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकरांच्या शिकारीसाठी वीजेच्या तारा लावल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केल्यानंतर कुंभार बंधूंचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कुंभार भावांचा मृत्यू झाल्याने घाबरून ही घटना कोणालाही कळू नये, यासाठी मृतदेह जंगलात फेकले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिवाळीच्या दिवशीच छोट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून…

दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…

माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!