ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…

पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याबद्दल रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनय अरहाना हा देखील उपचाराच्या नावाखाली ललित पाटील असलेल्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये होता. त्यानेच ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ललित पाटील हा ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमधे उपचारांच्या नावाखाली बंद होता. याच ठिकाणी रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना अटकेत होता. विनय अरहाना याच्यावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातून विनय अरहाना याने ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केली.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

ललित पाटील ससुन रुग्णालयातून 2 ऑक्टोबर रोजी निसटल्यानंतर प्रथम एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तिथून सोमवार पेठेत पोहचला. तिथे विनय अरहाना याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा कार घेऊन तयार होता. दत्ता डोके याने ललित पाटील याला पुण्याच्या बाहेर रावेतपर्यंत सोडले आणि स्वतः जवळचे दहा हजार रुपये ललित याला दिले. हे सगळे त्याने विनय अरहानाच्या सांगण्यावरून केले.

ललित पाटील प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर विनय अरहाना याला पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते. पुणे पोलिसांनी न्यायालयाकडून त्याचा ताबा मिळवून त्याला अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!