
सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस भरती परीक्षेसाठी नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर गेली असताना पती शिव कुमारला (वय २४) गोळी झाडून ठार मारल्याची संतापजनक घटना सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस भरती परीक्षा देण्यासाठी आकांक्षा सहारणपूरच्या गोचर इंटर कॉलेजला पोहोचली होती. तिचा पती शिव कुमारदेखील तिच्या सोबत होता. आकांक्षा परीक्षा देत असताना शिव कुमार केंद्राच्या बाहेरच होता. परीक्षा संपताच आकांक्षा बाहेर पडली. दोघे स्कॉर्पियो कारमध्ये बसून घराकडे रवाना निघाले होते. त्यांची कार महामार्गाच्या दिशेनं जाताच एक हल्लेखोर तिथे पोहोचला.
View this post on Instagram
आकांक्षाचा भाऊ मंजीतने शिव कुमारच्या डोक्यावर गोळी झाल्याचा आरोप आहे. गोळी लागताच शिव कुमार गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. शिव कुमारला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिव कुमारच्या अकाली मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या हत्याकांडामागे प्रेम विवाह असल्याचा आरोप केला जात आहे.
आकांक्षानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन चारच महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर कुटुंबातील काही सदस्यांनी या नात्याला विरोध केला. त्यांचा विरोध वाढत गेला. याच वैमनस्यातून माझा भाऊ मंजीतनं शिवला संपवले. प्रेम विवाहानंतर दोघांना सातत्यानं विरोधाचा सामना करावा लागत होता.’
सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…
सैराट! वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…
सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

