ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

पुणे: ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडच्या न्यायवैद्यक शास्रविभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रॅट महाविद्यालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.

ललित पाटील याच्यावर एकूण सहा डॉक्टर उपचार करत होते. मात्र त्याला कोणते आजार होते? त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावे काय आहेत? आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला? याबाबत ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी कोणालाही माहिती दिलेली नाही. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माहिती मागितल्यावर देखील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी त्यांना माहिती दिलेली नाही. ही माहिती आपण न्यायालयात दिली आहे एवढं एकच उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे ससूनच्या कारभारावर टीका होत आहे.

दरम्यान, ललित पाटील याला ससूनमधून पळून जाण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी मदत केल्याचा थेट आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. ललित पाटील याला ससूनमध्ये भरती करण्यासाठी दादा भुसे यांनी कॉल केल्याचा आरोप करत दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्या आधी पुणे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ललित पाटील प्रकरणी राज्य सरकारच्या मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

ललित पाटील हा नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेट चालवत असल्याने ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफियांशी अगोदर पासूनच संबंध आहेत. त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली. मात्र, ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!