पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…

मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. भाडेकरूची माहिती न ठेवल्यामुळे काही समाजकंटक त्याचा फायदा उठवत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पारगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील घर, फ्लॅट, जागा, गोडाऊन, दुकानदार तसेच छोट्या मोठ्या कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व इतर मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चारित्र्य प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी भाडेकरूचे पोलिस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूला गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देऊ नये. तसा प्रवेश दिल्यास प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केल्यास घरमालकाने त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.

दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात प्रशासकीय पातळीवरून देखील माहिती सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.

भाडेकरारासह भाडेकरुची संपूर्ण माहिती पोलिस स्टेशनला जमा करण्याचे आवाहन करत आहोत. भाडेकरूची व कामगारांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर व कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…

दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…

पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!