
पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…
पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलिस अधीक्षकांची किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, सार्वजनिक सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
View this post on Instagram
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, १३ ते २६ जून दरम्यान काही गोष्टींवर पूर्णपणे बंदी असेल. यात शस्त्र आणि स्फोटक पदार्थ बाळगणे, धारदार शस्त्रे, तलवारी, बंदुका, काठ्या, दगड किंवा कोणतेही दाहक आणि स्फोटक पदार्थ सोबत बाळगण्यास सक्त मनाई आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारी किंवा दोन गटांत तेढ निर्माण करणारी आवेशपूर्ण भाषणे करणे, घोषणा देणे किंवा चिथावणीखोर वक्तव्ये करण्यास बंदी आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचे दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश केवळ सर्वसामान्य नागरिक आणि संघटनांसाठी लागू असणार आहे. जे शासकीय कर्मचारी किंवा पोलिस ऑन-ड्यूटी आहेत, तसेच ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याची कायदेशीर परवानगी आहे, अशा व्यक्तींना या नियमातून सूट देण्यात आली आहे. जर कोणीही या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…
पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्…
संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…
Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…

