ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत.

ललित पाटील प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा हात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने येथील सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटील याचे सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे. तर आतापर्यंतच्या चौकशीत ललित पाटील हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्सचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती त्याच्या कॉल रेकॉर्डिंग वरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय प्रोफाइल ड्रग्स बनवून तो इंटरनॅशनल ड्रग्स बनवण्याचा प्रयत्न करणार होता, अशी देखील माहिती पोलिसांना आतापर्यंत त्याच्या चौकशी मिळाली आहे.

नाशिकमध्ये ड्रग्स बनवणारा ललित पाटील हा ड्रग्ज महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तर काही भागांमध्ये पाठवत होता. शिवाय, दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात देखील त्याचे जाळे पसरले होते. ललित पाटील याला नाशिकमधील फॅक्टरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मात्र ललित पाटील याचे हे ड्रग्जच साम्राज्य फक्त आंतरराज्य पुरतंच मर्यादित नव्हते तर तो देशाबाहेर देखील पसरवण्याच्या तयारीत होता, ही माहिती देखील त्याच्यात तपासात समोर आली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालची नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी स्थानिक आमदारांना हफ्ते जात असल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हळूहळू हे प्रकरण उलगडत आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!