ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे.
बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या ससूनच्या डीनपासून शिपायापर्यंत अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
‘ससून’मध्ये ललितला अमली पदार्थ देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोन ऑक्टोबरला पोलिसांना गुंगारा देऊन ललित पाटील पसार झाला आहे. बलकवडे याच्या नाशिक येथील घरावर छाप्यात पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केले आहे. ललिलच्या कुटुंबियांची चौकशी नाशिक, पुणे पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार केली आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यात 2 अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!