ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

मुंबई : फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ललित पाटील याच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ललित पाटील फरार होऊन नऊ दिवस झाल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि त्याच्यावर कोण डॉक्टर उपचार करत होते? हे ससूनकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ससूनच्या कारभारावर चांगलीच टीका केली जात आहे.

दरम्यान, ड्रग माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेदेखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर आहे. त्याने मेफेड्रॉन तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचे काम करत होता. भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा, अशी माहिती पुढे आली आहे.

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!