ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी (ता. २) रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

ड्रग्स प्रकरणात एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्यासह 9 जणांचा समावेश आहे. निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे,
१) पीएसआय जनार्दन काळे, २) पीसी विशाल ठोपले, ३) स्वप्नील शिंदे, ४) दिगंबर चंदनशिव, ५) पीएसआय मोहिनी डोंगरे, ६) हवालदार आदेश शिवणकर, ७) नाईक नाथाराम काळे, ८) शिपाई पिरप्पा बनसोडे, ९) शिपाई आमित जाधव.

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी (ता. ३०) रात्री दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ललित पाटील याला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी चाकण परिसरातून अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची मंडल याच्याशी ओळख झाली होती. शेख ससून रुग्णालयातील उपाहारागृहात कामगार आहे. शेख याच्यामार्फत मंडल पाटील याला मेफेड्रोन पोहचविणार होता. पाटील जून २०२३ पासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी ( ता. २) सायंकाळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मधून तो पसार झाला. पुणे स्टेशन परिसरातून निघालेला पाटील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. दरम्यान, कर्तव्य पार पाडताना बेफिकिरी दाखविल्याप्रकरणी नऊ जणांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!