ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय 30) असे या चालकाचे नाव आहे.

ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित पाटील यांना सतत मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सचिन वाघ याला अटक करुन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत साकीनाका पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ललित पाटील याचे ड्रग्ज रॅकेटचा विस्तार फार मोठा असल्याचे उघड झाले आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या ललितला साथ देत असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यांना आता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी होती. ती ललित पाटीलचं ड्रग्ज रॅकेट चालवण्याचे प्लॅनिंग करत होती. दोघे पुण्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटायचे. या सगळ्याचे आता खासगी फोटोदेखील समोर आले आहेत. ललित पाटील कधी मॉलमध्ये तर कधी आपल्या प्रेयसीजवळ दिसत आहे. त्यातच ललित पाटील जवळ दोन आयफोन देखील होते. या आयफोनच्या माध्यमातून ललित पाटील आपल्या साथीदारांशी आणि प्रज्ञा कांबळेशी संपर्कात होता. ससूनमधील खिडकीत बसून तो सिगारेट ओढतानाचा देखील फोटो एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे.

दरम्यान, ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्यानंतर रावेतपर्यंत सोडणाऱ्या चालकाला 7 ऑक्टोबरला अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. दत्ता डोके असे या गाडी चालकाचे नाव होते. डोके हा ससूनमध्ये भरती असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!