पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे: पुणे शहरातील सहकार नगर परिसरात बुधवारी (ता. १०) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आदित्य थोपटे याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुख्य आरोपी आदित्य थोपटे आणि जखमी युवक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. बुधवारी रात्री आरोपींनी सहकार नगर परिसरात पीडित युवकाला गाठले. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. आरोपींनी युवकावर थेट बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. गोळी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या युवकाला स्थानिक नागरिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, पुणे शहरात रात्री उशिरा गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. फरार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी कौशल्याने तपास करत मुख्य आरोपी आदित्य थोपटे याच्यासह इतर तिघांनाही अटक केली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपींनी बंदूक कुठून आणली याचा शोध घेतला जात आहे.

पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!