ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे.

ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आले आहे. त्यानंतर ससूनच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने या कैद्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना ससूनमध्ये ठेवण्याची गरज आहे का याबद्दल अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने सोमवारी संध्याकाळी अहवाल सादर केल्यानंतर १२ कैद्यांची येरवडा कारागृहात पुन्हा रवानगी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. मात्र, गेल्या 130 दिवसांपासून म्हणजे जवळपास चार महिने त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये आहे. आरोपी हेमंत पाटील याच्यावर खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पण, तो देखील गेले 41 दिवस ससूनमध्ये होता. गँगस्टर रुपेश मारणे हा कुख्यात गुंड गजा मारणे याचा पुतण्या असून, ससूनमध्ये तो 47 दिवस तळ ठोकून आहे.

ललित पाटील देखील जून महिन्यापासून ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. येरवडा कारागृहातील अधिकारी आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणायचा अभिप्राय दिल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. ड्रॅग रॅकेट चालवताना सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच हर्नियाच ऑपरेशन करण्याची शिफारस ससूनमधील डॉक्टरांनी केली होती आणि त्या दरम्यानच तो पळून गेला होता.

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!