ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

पुणे: ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने प्रचंड खळबळ आहे. पण, ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.

ललित पाटील हा ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर प्रथम एका पंचतारांकित हॉटेलमधे गेला. तिथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिथे दत्ता डोके हा विनय अरहाना याचा चालक ललित पाटील याच्यासाठी कार घेऊन थांबला होता. त्या कारमधून ललित पाटील पुण्यातील रावेतमध्ये पोहचला. रावेतमध्ये पोहचल्यावर दत्ता डोके याने ललित पाटील याला विनय अरहाना याच्या सांगण्यावरून दहा हजार रुपये दिले. ते पैसे घेऊन ललित पाटील प्रथम मुंबई, नाशिक आणि पुढे गायब झाला आहे.

दरम्यान, ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांची ओळख ससुनच्या जिथे कैद्यांवर उपचार केले जातात त्या 16 नंबर वॉर्डमध्ये झाली. त्या ओळखीतून विनय अरहानाने ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केली. विनय अरहाना हा रोझरी स्कुलचा संचालक असून रोझरी स्कुलच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी एका बँकेकडून घेतलेले 46 कोटी रुपयांचे कर्ज त्याने फॅशन शो आणि सेलिब्रेटींवर खर्च केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली अरहानाला अटक करण्यात आली, मात्र अपचन होत असल्याचे आजारपणाचे कारण देत तो ससुनमध्ये उपचार घेत आहे.

पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अंमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटील याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ललित मागील चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. वेगवेगळ्या आजाराची कारणं देत हा उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!