पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…

पुणे : युवक आणि युवतीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. दुसरीकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिस्कटली आणि लग्न मोडले. त्यानंतर युवतीचे तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला. युवकाला याबाबतची माहिती समजताच त्याने युवतीला त्रास द्यायला सुरूवात केली. दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडीओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील दाखवले, त्यानंतर युवतीचे जुळलेलं लग्न मोडले.

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग, बदनामी, छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती आणि आरोपी युवक यांची पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरू होती. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र नंतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं आणि युवतीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरले. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीने नव्या ठिकाणी ठरलेल्या युवकाची भेट घेतली आणि त्याच्यासमोर युवतीसोबतचे गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडीओ दाखवले. हे पाहून त्या युवकाने त्यांचे जमलेले लग्न मोडले.

युवतीने यानंतर थेट सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपीने विश्वासघात करून तिच्या संमतीशिवाय व्हिडीओ चित्रीकरण केले, त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली. यासोबतच लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…

पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…

पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप; पाहा घटनाक्रम…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!