पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर रविवारी (ता. ५) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिस ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री एकच्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत.

पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…

पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…

पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!