अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. दरम्यान ही घटना पाहता ही चोरी नव्हे तर सैफचा जीव घेण्याचा संशय येत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात पहाटे 2 वाजता ही संपूर्ण घटना घडली आहे. चोरटे पहाटेच्या सूमारास सैफ अली खानच्या घरात घुसले होते. यावेळी घरात चोरी करत असताना सैफला जाग आली होती. यावेळी सैफने मास्क घातलेला चोरटा पाहिला. सैफवर चोरट्याने चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. सैफसोबत त्याच्या घरातील एक कर्मचारी देखील जखमी झाला आहे. या घटनेनंतर चोरट्याने पळ काढला होता. या घटनेनंतर सैफ अली खान याला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लिलावती रूग्णालयात मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, करीना कपूर आणि तिची मुले सुरक्षित आहेत. या घटनेबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलिस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सैफ अली खानच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ निरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यांना पहाटे साडेतीन वाजता लीलावती येथे आणण्यात आले. त्याला सहा जखमा आहेत, त्यापैकी दोन खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच नुकसान किती आहे हे सांगू, असे डॉ. उत्तमणी यांनी सांगितले.

दरम्यान, सैफ करीना, मुलं आणि मोलकरणीला वाचवण्यासाठी धावला. सैफआधी तैमूरला वाचवताना चोराचा पहिला वार मोलकरणीने आपल्या हातावर झेलला. सैफ अली खान आणि चोर यांच्यात बाचाबाची झाली. चोरट्याने सैफवर चाकूने पाच-सहा वार केले. घरात एकच चोरटा घुसला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करत आहे. अटकेत असलेले हे तिघं सैफ अली खानच्या घरातील मदतनीस आहेत.

सैफ अली खान त्याच्या वांद्रे येथील घरात गाढ झोपेत होता. करीना कपूर आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही घरात होते. प्रथम मोलकरणीने चोराला पाहिले आणि चोराला पाहून ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोर चाकू घेऊन तिच्याकडे धावला. चोराने वार करायचा प्रयत्न तिने तो वार आपल्या हातावर झेलला. माहितीनुसार मोलकरीण तेव्हा सैफच्या मुलांसोबत होती. आरडाओरडा ऐकून सैफला जाग आली आणि तो धावून आला. चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. चाकूच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर संधी साधून चोर तिथून पळून गेला. तोपर्यंत कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!