भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे.
जबलपूर येथील गुंड पप्पू साहू याच्याबरोबर लग्नानंतर सना खान यांचे वाद झाले होते. पप्पू साहू याच्या नोकरालाही पोलिसांनी याआधी ताब्यात घेतले होते. पप्पू साहू याच्या कारमधून रक्ताचे डाग धुवून काढल्याची माहिती नोकराने यावेळी दिली होती.
सना खान ह्या नागपूर पश्चिम महिला भाजपच्या पदाधिकारी असून त्या मागील आठ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांना जबलपूर येथून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या एक ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार सना खान यांच्या आईने मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. अखेर सना खान यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
पप्पू साहू याच्या नोकराने कबुली दिली की, त्याने गाडीच्या डिक्कीतील रक्त साफ केले होते. यासोबतच मृतदेह हिरन नदीत फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हिच्या हत्याकांडात मुख्य आरोपी पप्पू साहू याच्याविरोधात आता नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अमित उर्फ पप्पू हा फरार झाला असून त्याने ढाब्यालाही कुलूप लावले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…
प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…