पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…

पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. एका विद्यमान नगरसेवकानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी नगरसेवकांसह तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकेश यादव गुन्हा दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकाचे नाव आहे. ते भालके गटाच्या ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’चे विद्यमान नगरसेवक आहेत. लोकेश यादव यांच्यासह माजी नगरसेवक नागेश यादव आणि इतर २० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपी नगरसेवक लोकेश यादव आणि त्याचे साथीदार पीडित व्यक्तींकडे वारंवार ‘भिशी’ लावण्याचा तगादा लावत होते. मात्र, संबंधित तिघांनी भिशी लावण्यास नकार दिल्याने आरोपींचा राग अनावर झाला. याच रागातून लोकेश यादव आणि नागेश यादव यांनी आपल्या साथीदारांसह मिळून या तिघांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित व्यक्तींच्या तक्रारीवरून पंढरपूर पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव आणि माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह एकूण २० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एका लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्यामुळे पंढरपुरात मोठी चर्चा सुरू आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…

पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!