मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…

मुंबईः गिरगावमध्ये छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफिनं पर्दाफाश केल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका केली. त्यापैकी एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री असून दुसरी बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. पोलिसांनी दोघींचीही ओळख उघड केलेली नाही.

मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि आवश्यक ती तयारी पूर्ण केल्यानंतर छापा टाकला. या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, जिनं अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्यात, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये छोट्या आणि ‘कॅमिओ’ भूमिकांमध्ये झळकलीय. रॅकेट चालवताना रंगेहाथ पकडलेला एजंट प्रत्यक्षात एक ‘मेकअप आर्टिस्ट’ आहे, जो विविध सेलिब्रिटींसोबत काम करतो. त्यानंच या अभिनेत्रींना या रॅकेटमध्ये ओढले, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मुंबई पोलिसांना गिरगावातील सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. या बेकायदेशीर कृत्यांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होऊन पोलिसांना तसा संदेश मिळताच, पथकानं त्वरित छापा टाकला आणि त्या महिलांची सुटका केली. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. हे एक ‘हाय-प्रोफाईल’ रॅकेट मानलं जात असून त्यात बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आगामी काळात आणखी काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…

हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…

उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!