ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं युवकाची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नवऱ्याचा खून केल्यानंतर वडील आपल्यालाही संपवतील, तशी भीती विद्या किर्तीशाही हिने व्यक्त केली आहे.

लग्न होऊन अवघा एक महिनाच झाला होता. तोच ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. अमित साळुंखे असं या तरुणाचं नाव आहे. तर विद्या किर्तीशाही असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.

विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला. विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगर मध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केले आणि लग्नाला एक महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमितला घराबाहेर बोलवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अमितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेतील पीडितेचा आर्त टाहो ऐकूण मन सुन्न होत आहे. आमची स्वप्न एका सेकंदात चिरडली गेली. आमची स्वप्न खूप छोटी छोटी होती. मला खूप शिकवायचे होते. मी काय चूक केली? आवडीचा साथीदार निवडला, प्रेम विवाह केला. आरोपींना शिक्षा होऊन मला न्याय जरी मिळाला तरी माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? माझे व्हायचे ते नुकसान झाले आहे. असा सवाल विद्याने केला आहे. पण, आपले वडील आपल्यालाही संपवतील, तशी भीती तीने व्यक्त केली आहे.

ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…

पोलिसकाका Video News: ३० जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…

यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!