
नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…
नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक शहरचे पोलिस आयुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असून, टवाळखोरांवर कारवाई केली आहे.
नाशिक शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करीत 34 लाख 36 हजार 573 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तसेच 14 कट्टे, 22 काडतुसे, 71 धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच 7 लाख 50 हजार 155 रुपयांची 1 हजार 533 लिटर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. एमडी प्रकरणी तीन व गांजा प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले. तसेच 3 हजार 832 टवाळखोर व गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध अशा कारवाई केल्या आहेत. नाशिक पोलिसांनी दोन टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्यानुसार 10 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तर सुमारे 100 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्य विक्री व वाहतूक प्रकरणी 1 हजार 319 गुन्हे दाखल करुन 1 कोटी 29 लाख 12 हजार 907 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. त्याप्रकरणी 1 हजार 233 संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच अवैध गुटखा प्रकरणी 97 जणांविरोधात 80 गुन्हे दाखल करून 56 लाख 45 हजार 40 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तर 3 हजार 631 टवाळखोर, गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे.
नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

